चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : (५) [२०]
(१) कंपनीला सरकारकडे ___________________भरावा लागतो.
(अ) कर (ब) लाभांश (क) व्याज
(२) _______________भाग विद्यमान समहक्क भागधारकास विनामूल्य दिले जातात.
(अ) समहक्क (ब) हक्क (क) बोनस
(३) ________________हा भागांच्या मालकीचा पुरावा आहे.
(अ) सभासद रजिस्टर (ब) भाग प्रमाणपत्र (क) भाग वाटपपत्र
(४) कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे_________________ भांडवल असते.
(अ) मालकीचे (ब) कायम (क) कर्जाऊ
(५) लाभांश प्रथम_________________ भागधारकांना दिला जातो.
(अ) समहक्क (ब) अग्रहक्क (क) स्थगित
(ब) खालील विधाने ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा : (५)
(१) वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहेत.
(२) अंशतः किंवा पूर्ण रक्कम भरलेल्या भागांसाठी भाग प्रमाणपत्र दिले जाते.
(३) सरकारी कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारू शकते.
(४) ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात.
(५) प्राथमिक बाजार नवीन प्रतिभूतीचा बाजार म्हणून ओळखला जातो.
(क) गटात न बसणारा शब्द शोधा : (५)
(१) दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, परतफेडीचे मूल्य
(२) परिवर्तनीय कर्जरोखे, न परतफेडीचे कर्जरोखे, सुरक्षित कर्जरोखे
(३) लाभांश अधिपत्र, व्याज अधिपत्र, डीमॅट
(४) डि.पी, आरबीआय (RBI), डिपॉझिटरी
(५) अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, व्याज
(ड) कंसातील अचूक पर्याय निवडा: (५)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) समहक्क भाग (१)_____________________________
(ब) कायदयानुसार कृती (२)_____________________________
(क)_______________________ (३) कर्जरोखे प्रमाणपत्र
(ड) डिमटेरियलायझेशन (४)____________________________
(इ)________________________ (५) भारतातील सर्वात जुना भाग बाजार
(कर्जरोखे वाटपापासून ६ महिन्याच्या आत, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात,
चढ उतार होणारा लाभांशाचा दर, मुंबई भाग बाजार (BSE), भागांचे संक्रमण.)
प्र. २. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) : [८]
(१) खेळते भांडवल
(२) अधिविकर्ष (overdraft)
(३) हक्क भाग
(४) डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (डी. पी.)
(५) दुय्यम बाजार
(६) भाग बाजार
प्र. ३. खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणतेही दोन): [६]
(१) साई कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी आहे. ती समहक्क भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी
करणार आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक विविध पर्यायांचा विचार करीत आहेत. खालील गोष्टींबाबत संचालकांना सल्ला दया :
(अ) कंपनीने कोणत्या प्रकारे भाग विक्री करावी- आय. पी. ओ. की एफ. पी. ओ.?
(ब) भांडवल उभारणीसाठी कंपनी बोनस भागाचे वाटप करू शकते का?
(क) कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते का?
(२) श्री किशोर यांना त्यांच्या हिरो कंपनी लिमिटेड या कंपनीचे २५ भागांचे डिमॅटीकरण करायचे आहे. त्याचा भाग प्रमाणपत्र क्रमांक १०० आहे
आणि भागांचे अनुक्रमांक ७६-१०० असे आहेत.
(अ) डी.पी.ला विनंती म्हणून कोणता अर्ज भरावा लागेल? डी. आर. एफ. की आर. आर. एफ.?
(ब) डिमॅटनंतर तेच भाग हस्तांतरित करायचे असल्यास त्यास हस्तांतरण अर्ज भरावा लागेल का?
(क) डिमॅटीकरणानंतर जर भाग हस्तांतरित करायचे असतील तर त्यासाठी भाग प्रमाणपत्र क्रमांक व भाग अनुक्रमांक नमूद करवा लागेल का?
(३) डायमंड कंपनी लिमिटेड अंतरिम लाभांश घोषित करण्याचा विचार करत आहे.
(अ) लाभांश जाहीर केल्यापासून किती दिवसांमध्ये लाभांश खात्यात लाभांश निधी हस्तांतरित केला पाहिजे?
(ब) भागधारकांना किती दिवसांमध्ये लाभांश वाटप केले पाहिजे?
(क) संचालक मंडळ भांडवलातून अंतरिम लाभांश जाहीर करू शकते का?
प्र. ४. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१२]
(१) स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
(२) भाग आणि कर्जरोखे
(३) प्राथमिक भाग विक्री (IPO) आणि पुढील / नंतरची भाग विक्री (FPO)
(४) अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
प्र. ५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [८]
(१) भाग प्रमाणपत्रावरील तपशील विशद करा.
(२) गुंतवणुकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.
(३) सेबीचे कार्ये स्पष्ट करा.
प्र. ६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : [८]
(१) कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
(२) सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत.
(३) समहक्क भागधारकांना लाभांश प्राप्तीमध्ये शेवटचे प्राधान्य मिळते.
(४) भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
प्र. ७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) भाग प्रमाणपत्र वाटपाचे पत्र भागधारकास लिहा.
(२) कर्जरोख्याच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र लिहा.
(३) ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा.
प्र. ८. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) : [८]
(१) समहक्क भाग म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(२) भाग वाटपाच्या कायदेशीर / वैधानिक / नियामक तरतुदी स्पष्ट करा