चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा : (५) [१५]
(१) भाग वाटपाला दिलेला नकार (refusal)________________पत्राद्वारे कळविला जातो.
(अ) दिलगिरी (ब) वाटप (क) हप्ता मागणी
(२) जर ₹ १०० अंकित मूल्याचा भाग ₹ १०० ला विकला, तर असा भाग____________ विकला असे म्हणता येईल.
(अ) वाढावा घेऊन (ब) दर्शनी मूल्यास (क) कसर देऊन
(३) मालकाच्या संपत्तीचे महत्तमीकरण (maximization) म्हणजेच भागांच्या_____________ महत्तमीकरण होणे होय.
(अ) दर्शनी मूल्याचे (ब) विक्री मूल्याचे (क) बाजार मूल्याचे
(४) न दिलेला (unpaid) व मागणी न केलेला लाभांश____________ वर्षेपर्यंत न दिल्यास ‘गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी’ खात्याकडे वर्ग केला जातो.
(अ) तीन (ब) सात (क) सहा
(५) भाग भांडवल असलेल्या कंपनीने___________________ भाग निर्गमित केलेच पाहिजेत.
(अ) समहक्क (ब) अग्रहक्क (क) हक्क
(ब) गट ‘अ’ व गट ‘ब’ यांतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा : (५)
गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) लाभांश (१) परतफेडीबाबत सुरक्षितता
(च) वित्तीय आराखडा (२) १८७५
(क) सुरक्षित कर्जरोखे (३) भागधारकांच्या गुंतवणुकीवरील मोबदला
(ड) अमेरिकन ठेव पावती (A.D.R.) (४) १८५७
(इ) मुंबई भाग बाजाराची स्थापना (५) व्यवसायिक निधीचे व्यवस्थापन
(६) मुदतपूर्तीनंतर परतफेड
(७) कर्जरोखा प्रमाणपत्र धारक
(८) वित्तीय व्यवस्थापनाची आगाऊ योजना
(९) अमेरिकाव्यतिरिक्त इत्तर कोणत्याही देशामध्ये स्वीकारली जाते.
(१०) अमेरिकेत स्वीकारली जाते
(क) खालील प्रत्येक विधानासाठी फक्त ‘एक’ शब्द / शब्दसमूह / संज्ञा लिहा : (५)
(१) ज्या बाजारामध्ये अल्प मुदतीचा निधी कर्जाऊ दिला जातो व घेतला जातो.
(२) विदामान समहक्क (equity) भागधारकांना भेट (gift) म्हणून दिले जाणारे भाग.
(३) ज्या बंधपत्राचे (bond) व्याजाचे दर संपूर्ण मुदत संपेपर्यंत स्थिर राहतात.
(४) गुंतवणूकदार व डिपॉझिटरी यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणारी संस्था.
(५) सभासदांना लाभांश वाटपासांठी वापरला जाणारा दस्तऐवज.
प्र. २. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) भौतिकीकरण (dematerialization) व अभौतिकीकरण (rematerialization)
(२) भागांचे हस्तांतरण (transfer) व भागांचे संक्रमण (transmission)
(३) प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार
(४) भाग व कर्जरोखे
(५) अंतरिम लाभांश व अंतिम लाभांश
प्र. ३. खालील विषयांवर टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) भाग अधिपत्र (warrant)
(२) वित्त नियोजनाचे महत्त्व
(३) प्राथमिक सार्वजनिक भाग विक्रीचा प्रस्ताव (I.P.O.)
(४) जागतिक ठेव पावती (G. D. R.)
(५) वाटप न केलेल्या / मागणी न केलेल्या लाभांशासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी.
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही तीन): [१५]
(१) वित्तीय बाजाराचे देशाच्या आर्थिक वाढ व विकासामध्ये योगदान असते.
(२) बंधपत्रधारक हे कंपनीचे मालक असतात.
(३) ठेवीच्या नूतनीकरणासाठी ठेवीदाराची संमती आवश्यक असते.
(४) भाग प्रमाणपत्र हा वाहक (bearer) दस्तऐवज आहे.
(५) कर्जरोख्यांची परतफेड कंपनी कधीच करत नाही.
प्र. ५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [१०]
(१) कर्जरोखेधारकांचे कंपनीमधील स्थान विशंद करा.
(२) कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार पत्र तयार करा.
(३) स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक लिहा.
(४) कर्जरोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र तयार करा.
प्र. ६. ‘अग्रहक्क’ (preference) भागांची व्याख्या लिहा. अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. [१०]
किंवा
अर्जदाराला भागवाटप केले असल्याचे कळविणारे पत्र लिहा.