चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र.१. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा : (५) [१५]
(१) वेगवेगळ्या निधींच्या स्रोतांचे आवश्यक प्रमाणात एकत्रीकरण करणे म्हणजे___________________ होय.
(अ) भांडवल संरचना (ब) मुदतीचे कर्ज (क) प्रतिधारण नफा
(२) जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते तिला कंपनीचा ____________________असे म्हणतात.
(अ) बंधपत्रधारक (ब) भागधारक (क) धनको
(३) जर ₹ १०० मूल्य असलेला भाग ₹ १०० लाच विकला, तर असा भाग ________________विकला असे म्हणतात.
(अ) वाढावा घेऊन (ब) कसर देऊन (क) दर्शनी मूल्यास
(४) डिपॉझिटरी कायदा ____________________साली संमत झाला.
(अ) १९९६ (ब) १९८६ (क) १९८५
(५) लाभांश मिळण्यासाठी लाभांश अधिपत्रे______________ धारकाना पाठवली जातात.
(अ) कूपन (ब) भाग अधिपत्र (क) भाग दाखला
(ब) योग्य जोड्या जुळवा : (५)
गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) वित्त नियोजन (१) लाभांश
(ब) सार्वजनिक ठेवी (२) अपेक्षेपेक्षा कमी अर्ज
(क) खाजगी रीतीने भाग विक्री (३) मालकीचे भांडवल
(ड) सुरक्षित कर्जरोखे (४) वित्तीय आराखड्याचा आगाऊ तयार केलेला कार्यक्रम
(इ) भागावरील परतावा (५) बोनस
(६) जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन न करता भागाची विक्री करणे
(७) कमाल ७ वर्षे
(८) परतफेडीबाबत सुरक्षितता
(९) कमाल ३६ महिने
(१०) व्यावसायिक कार्याचे व्यवस्थापन
(क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द / शब्दसमूह / संज्ञा सुचवा : (५)
(१) ज्या भागांची परतफेड एका ठरावीक काळानंतर करावी लागते असे भाग.
(२) दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मध्ये घोषित केला जाणारा लाभांश.
(३) कंपनीने ठेव स्वीकारल्याबद्दल दिली जाणारी पोच पावती.
(४) सरकारतर्फे वचनचिट्ठी स्वरूपात विक्रीस काढले जाणारे विपत्र.
(५) भाग बाजाराच्या इमारतीतील विशिष्ट मजला किंवा जागा जेथे भागांची खरेदी-विक्री अथवा लिलाव केला जातो.
प्र-२. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) स्थिर भांडवल व खेळते भांडवल
(२) भागधारक व कर्जरोखेधारक
(३) भाग हस्तांतरण व भाग संक्रमण
(४) भाग प्रमाणपत्र व भाग अधिपत्र
(५) प्राथमिक बाजारपेठ व दुय्यम बाजारपेठ
प्र. ३. खालील विषयांवर टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) ठेवींची स्वीकृती
(२) प्रतिधारण संचयी नफा
(३) कर्मचारी भाग विकल्प योजना (E S.O.S)
(४) डिपॉझिटरी पद्धतीचे महत्त्व
(५) मुंबई भागबाजार
प्र. ४. खालील विधाने ‘चूक’ किंवा ‘बरोबर’ ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही तीन) : [१५]
(१) अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात.
(२) भाग प्रमाणपत्र वाहक (bearer) दस्तऐवज आहे.
(३) आगाऊ भागहप्ता रकमेवर लाभांश दिला जाऊ शकतो.
(४) डिपॉझिटरी पद्धतीतील भागाचे हस्तांतरण हे वेगाने व कमी खर्चात होते.
(५) लाभांश वाटपाबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.
प्र.५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [१०]
(१) कर्जरोख्यांवर व्याज देण्याबाबत पत्र लिहा.
(२) भांडवल संरचनेवर प्रभाव टाकणारे बाह्य घटक लिहा.
(३) ठेवीची रक्कम परत करण्यात येत असल्याचे पत्र ठेवीदारास लिहा.
(४) कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तनाबाबत माहिती देणारे पत्र लिहा.
प्र. ६. समहक्क भागांची व्याख्या देऊन त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. [१०]
किंवा
भागवाटपाची माहिती देणारे पत्र लिहा.