वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१) प्रश्नपत्रिका
Organisation Of Commerce And Management (51)
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१)
Time 3 Hours Marks 80
Organisation Of Commerce And Management (51)
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (५१)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
प्र. १. (अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा : (५) [२०]
(१) संज्ञापन साखळी म्हणजे ___________________पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद.
(अ) शिस्त (ब) ऐक्य (क) अधिकार
(२) नाशवंत वस्तू__________________ गोदामात साठविल्या जातात.
(अ) करदेय (ब) शीतगृह (क) सरकारी
(३) ऑनलाईन व्यवहार करण्यास___________________ आवश्यक असते.
(अ) नोंदणी (ब) व्यापार (क) व्यवसाय
(४) जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष _______________________असतात.
(अ) जिल्हा न्यायाधीश (ब) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (क) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
(५) किरकोळ बाजार हा असा बाजार आहे की जेथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री_____________ यांना लहान प्रमाणात करतो.
(अ) उत्पादक (ब) घाऊक व्यापारी (क) उपभोक्ता
(ब) योग्य जोड्या जुळवा : (५)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) हेन्री फेयॉल (१) एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते
(ब) निर्देशन (२) शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
(क) शासनाप्रति जबाबदारी (३) एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो
(ड) डिजिटल रोख (४) नफा मिळविणे
(इ) मक्तेदारी (५) नियम व कायदयांचा आदर
(६) फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व
(७) सर्वत्र अस्तित्व
(८) एकच खरेदीदार
(९) आधुनिक व्यवस्थापनाचा सिद्धांत
(१०) एकच विक्रेता
(क) खालील विधाने ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा : (५)
(१) एफ. डब्ल्यू, टेलर यांनी व्यवस्थापनाची १४ तत्त्वे विकसित केली.
(२) चालू खाते हे नोकरदार व्यक्ती उघडतात.
(३) अनियंत्रित बाजार हा मागणी व पुरवठ्याच्या प्रभावावर चालतो.
(४) ग्राहक बाजारपेठेचा राजा असल्यामुळे त्यास कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत.
(५) लोक अदालत लोक न्यायालय म्हणून ओळखली जाते.
(ड) गटात न बसणारा शब्द ओळखा : (५)
(१) नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, लेखन
(२) ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी करणे, बैठे खेळ
(३) प्राथमिक पतसंस्था, राज्य सहकारी बैंक, जिल्हा सहकारी बैंक, विनिमय बैंक
(४) B to B, B to C, A to Z, C to C
(५) भाग बाजार, परकीय चलन, सोने-चांदी बाजार, उत्पादित वस्तूंचा बाजार
प्र. २. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) : [८]
(१) व्यवस्थापन (२) सामाजिक जबाबदारी
(३) विश्वस्त संकल्पना (४) जनहित याचिका
(५) बांधणी / परिवेष्टन (६) उत्पादन
प्र. ३. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणतेही दोन): [६]
(१) श्री. राम, एक उदयोन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामग्री आणि कामगार वर्ग इत्यादी
आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना तयार केली आहे. त्यांनी श्री. श्याम यांना व्यवस्थापक म्हणून
नियुक्त केले. श्री. राम यांनी कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, विकास आणि वेतन ठरविणे यासारख्या जबाबदाऱ्या श्री. श्याम
यांना दिल्या आहेत. श्री. राम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकांनुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांवर देखरेखीसाठी श्री. शुभम यांचीही
नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार श्री. शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात. या संदर्भात खालील व्यक्तीकडून व्यवस्थापनाची
कोणती कार्ये सादर केली जातात ?
(१) श्री. राम (२) श्री. श्याम (३) श्री. शुभम
(२) श्री. अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना
५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत.
(अ) श्री. अमित हे त्यांच्या पत्नी व दोन मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?
(ब) श्री. अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का?
(क) आगीमुळे कारखानाच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. अमित घेऊ शकतात?
(३) श्री. अथर्व यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याचवेळी श्री. समर्थ यांनी (फंड ट्रान्सफर) निधी वर्ग द्वारे पैसे दिले तर…
(अ) कोणाचे पैसे जलद पद्धतीने दिले जातात ?
(ब) कोणाची पैसे देण्याची पद्धती ही पारंपरिक मार्गाने केली आहे?
(क) कोणाची पैसे देण्याची पद्धती ही इ-व्यवसायाशी संबंधित आहे?
प्र. ४. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१२]
(१) चालू खाते आणि मुदत ठेव खाते
(२) संघटन आणि निर्देशन
(३) राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग
(४) इ-वाणिज्य आणि इ-व्यवसाय
प्र. ५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [८]
(१) शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्रांचे वर्णन करा.
(२) ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा.
(३) विपणनाची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.
प्र. ६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : [८]
(१) नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे.
(२) उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे.
(३) ए. टी. एम. मधून कधीही पैसे काढता येतात.
(४) ग्राहकांस अनेक जबाबदाऱ्या आहेत.
प्र. ७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) व्यवस्थापन तत्त्वाचे स्वरूप स्पष्ट करा.
(२) पोस्टाने पैसे (निधी) पाठविणाच्या सेवा व सामान्य सेवा स्पष्ट करा.
(३) ग्राहकांप्रति व्यवसाय संघटनांच्या सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
प्र. ८. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही एक) : [८]
(१) रस्ते वाहतूक म्हणजे काय? रस्ते वाहतुकीचे फायदे आणि तोटे सांगा.
(२) समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा.