सहकार (५३) प्रश्नपत्रिका
Co-operation (53)
सहकार (५३)
Time 3 Hours Marks 80
Co-operation (53)
सहकार (५३)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील आकडे प्रश्न क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
प्र. १. (अ) खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा : (५) [२०]
(१) नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या_______________________ प्रती जोडाव्या लागतात.
(अ) चार (ब) दोन (क) तीन
(२) केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती_________________सभासद होय.
(अ) सहयोगी (ब) क्रियाशील (क) नाममात्र
(३) भारतातील दुसरा सहकारी कायदा_________________ साली संमत झाला.
(अ) १९०४ (ब) १९१२ (क) १९२५
(४) महाराष्ट्र सहकारी कायदयानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील______________ टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे.
(अ) २५ (ब) १५ (क) १२
(५) सहकारी संस्था मार्फत उत्पादन प्रक्रियेत________________ व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो.
(अ) नियंत्रित (ब) परंपरागत (क) आधुनिक
(ब) ‘अ’ गटातील शब्दांच्या ‘ब’ गटातील शब्द/शब्दसमूहासोबत योग्य जोड्या जुळवा : (५)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) सहयोगी सभासद . (१) निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्ये
(ब) सहकारी संस्थेची संरक्षक भिंत (२) ए. टी. एम.
(क) दोषी संस्थेविरुद्ध कारवाई (३) १९४६
(ड) सुरक्षित खण (४) संयुक्तपणे भाग धारण करतो
(इ) सहकार नियोजन समिती (५) निबंधकाचे विकासात्मक कार्ये
(६) राखीव निधी
(७) मौल्यवान वस्तू ठेवणे
(८) १९५४
(९) केवळ प्रवेश शुल्क भरतो
(१०) ठेवी
(क) खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते लिहा : (५)
(१) सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेबतपासणी महत्त्वाची असते.
(२) सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते.
(३) सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे.
(४) क्रियाशील सभासदांना लाभांश मिळविण्याचा अधिकार नसतो.
(५) सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा.
(ड) एका वाक्यात उत्तरे लिहा : (५)
(१) मुदत ठेव म्हणजे काय?
(२) सभासद म्हणजे काय?
(३) दीर्घमुदतीच्या कर्जाचा कालावधी किती असतो ?
(४) ठराव म्हणजे काय?
(५) उपविधी म्हणजे काय?
प्र. २. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) : [८]
(१) संचालक (२) सहकार आयुक्त व निबंधक
(३) अक्रियाशील सभासद (४) बहुराष्ट्रीय कंपनी
(५) उपाध्यक्ष (६) जिल्हा सहकार मंडळे
प्र. ३. खालील विधानांबाबत स्वमत लिहा (कोणतेही दोन) : [६]
(१) सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकेक्षणानंतर तिला अंकेक्षण वर्ग दिला जातो.
(२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे.
(३) नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो.
प्र. ४. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१२]
(१) कार्यक्रमपत्रिका आणि इतिवृत्त
(२) नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक
(३) नंफा-तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक
(४) अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक
प्र. ५. संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही दोन) : [८]
(१) सहकार क्षेत्रापुढील आव्हाने
(२) सभासदांच्या पात्रता
(३) सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज
प्र. ६. कारणे लिहा (कोणतेही दोन) : [८]
(१) क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो.
(२) सभेला गणसंख्येची आवश्यकता असते.
(३) सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात.
(४) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्त्व करते.
प्र. ७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा.
(२) सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र लिहा.
(३) सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती?
प्र. ८. सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा. [८]
किंवा
सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा.