चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : (५) [२०]
(१)_________________ हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे.
(अ) उत्पादन (ब) विपणन (क) वित्त
(२) सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड त्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून_________________ केली पाहिजे.
(अ) १० दिवसांत (ब) १० वर्षात (क) १५ वर्षात
(३) भारतात __________________डिपॉझिटरी पद्धती आहे.
(अ) एकल (ब) बहु (क) एक
(४) लाभांशाचे वाटप लाभांश घोषित झाल्याच्या तारखेपासून संभासदांना_________________ दिवसांच्या आत झाले पाहिजे.
(अ) ३० (ब) ४० (क) २०
(५) ________________अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो.
(अ) परतफेडीच्या (ब) संचयी (क) परिवर्तनीय
(ब) खालील ‘अ’ आणि ‘ब’ गटांतील दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा : (५)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) कर्जरोख्यांत गुंतवणूक (१) भांडवल संपादन व त्याचा विनियोग
(ब) वित्तीय बाजार (२) लाभांश वाटपाच्या घोषणेची माहिती भाग बाजाराला देणे आवश्यक
(क) माहितीपत्रकात नमूद केलेली भागाची किंमत (३) वित्तीय प्रतिभूतीचा व्यापार
(ड) संस्थात्मक वित्तव्यवस्था (४) सुरक्षित गुंतवणूक
(इ) सूचीबद्ध कंपनी (५) लाभांश वाटपाच्या घोषणेची माहिती सरकारला दयावी लागते.
(६) स्थिर किंमत भाग विक्री पद्धत
(७) जोखमीची गुंतवणूक
(८) वस्तूंचा व्यापार
(९) संपत्तीचे संपादन व त्यांचा विनियोग
(१०) बुक बिल्डींग पद्धती
(क) खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा : (५)
(१) लाभांश भांडवलातून देता येतो.
(२) ठेवी जास्तीत जास्त ६ महिन्यांसाठी स्वीकारल्या जातात.
(३) जागतिक ठेव पावती धारकाच्या (GDR) वतीने भागपेढ्या समभागाचा साठा करून ठेवते.
(४) प्रतिभूती बाजार हा भारतातील असंघटीत बाजाराचे ठिकाण आहे.
(५) बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात.
(ड) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा : (५)
(१) ठेवीदार हे कंपनीचे मालक असतात.
(२) प्रतिधारण नफा / संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा बहिर्गत स्रोत आहे.
(३) कर्जरोख्यांचे पतमानांकन करण्यासाठी कंपनी भागविमेकऱ्याची नियुक्ती करते.
(४) दुय्यम बाजारात कंपनी जनतेला प्रथमतः नवीन भागांची विक्री करते.
(५) अग्रहक्क भागधारकांना अविशिष्ट / उर्वरित नफ्यापासून लाभांश मिळतो.
प्र. २. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) : [८]
(१) उत्पादन चक्र
(२) अधिविकर्ष
(३) कर्मचारी भाग खरेदी योजना (ESPS)
(४) डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डी. पी.)
(५) लाभांशाचा दर
(६) हक्कभाग विक्री
प्र. ३. खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणत्याही दोन) : [६]
(१) सनफ्लॉवर कंपनी (Sunflower Co. Ltd) मर्यादित भांडवल गोळा करण्यासाठी जनतेस कर्जरोखे वाटपाचा (विक्रीचा) प्रस्ताव ठेवते.
सदर प्रस्तावावर चर्चा करून संचालक मंडळाने दहा वर्षाच्या मुदतीचे सुरक्षित अपरिवर्तनीय परतफेडीच्या कर्जरोख्याची विक्री (वाटप)
करण्याचे ठरविले आहे. कृपया खालील बाबतीत संचालक मंडळास सल्ला दया:
(अ) कंपनीने कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी का?
(ब) कंपनीने आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे का?
(क) कर्जरोख्याची मुदत दहा वर्षापेक्षा कमी ठेवता येईल का?
(२) ‘अबक कंपनी लिमिटेड’ ही सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भात कंपनी कायदा २०१३ नुसार पात्र सार्वजनिक कंपनी आहे.
(अ) कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते का?
(ब) कंपनीला तिच्या सभासदांकडून ठेव स्वीकारता येईल का?
(क) कंपनी सुरक्षित ठेवी स्वीकारू शकते का?
(३) जॉय कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली कंपनी आहे. जिला प्रथमच भांडवल उभारणीसाठी समहक्क भागांची विक्री करावयाची आहे.
(अ) भाग विक्रीसाठी प्राथमिक बाजारात का दुय्यम बाजारात जावे लागेल?
(ब) सार्वजनिक भाग विक्री की हक्क भाग विक्री म्हणून भाग विक्रीचे आवाहन करता येईल?
(क) जॉय कंपनी लिमिटेडने समहक्क भाग विक्री केली तर त्यास काय म्हणता येईल-प्राथमिक भाग विक्री का पुढील / नंतरची दुय्यम भाग विक्री ?
प्र. ४. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१२]
(१) स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
(२) भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण
(३) डिमटेरिअलायझेशन आणि रिमटेरिअलायझेशन
(४) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
प्र. ५. खालील प्रश्नांचे उत्तरे थोडक्यात लिहा (कोणतेही दोन) : [८]
(१) बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा.
(२) गुंतवणूकदारांच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.
(३) व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
प्र. ६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन) : [८]
(१) संचालक मंडळ भागांच्या हस्तांतरास नकार देऊ शकते.
(२) भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) भारतातील प्रतिभूतींच्या व्यवहाराचे नियमन करते.
(३) कंपनीस ‘न दिलेला लाभांश’ वापरता येत नाही.
(४) कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी / नक्कल प्रत देऊ शकते.
प्र. ७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारकास लिहा.
(२) कर्जरोखेधारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा.
(३) कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.
प्र. ८. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) : [८]
(१) अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा.
(२) कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदी स्पष्ट करा.