चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) प्रश्नांच्या खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा (५) [१५]
(१) भाग बाजारातील तेजीच्या (boom) काळात भांडवल उभारणीसाठी________________विक्री केली जाते.
(अ) बंधपत्रांची (bonds) (ब) कर्जरोख्यांची (क) समहक्क भागांची
(२) जागतिक ठेव पावत्यांमुळे________________ भाग बाजारातून जास्तीत जास्त भांडवल उभे करणे शक्य होते.
(अ) राष्ट्रीय (ब) आंतरराष्ट्रीय (क) स्थानिक
(३) जर ₹ १०० चा एक भाग ₹ १०० ला विकला, तर असा भाग________________विकला असे म्हणता येईल.
(अ) दर्शनी मूल्यास (ब) कसर देऊन (क) वाढावा घेऊन
(४) लाभांश जाहीर केल्यापासून__________________दिवसांच्या आत लाभांशाचे वाटप करणे आवश्यक असते.
(अ) ४५ (ब) २१ (क) ३०
(५) आशियातील सगळ्यांत जुना भाग बाजार__________________ हा आहे.
(अ) राष्ट्रीय भाग बाजार (NSE) (ब) मुंबई भाग बाजार (BSE) (क) कलकत्ता भाग बाजार (CSE)
(ब) खालील ‘अ’ गट व ‘ब’ गट यांतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा : (५)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) वित्तीय व्यवस्थापन (१) बचत खाते
(ब) अधिविकर्ष सवलत (२) दुसऱ्या व्यक्तीला भागांची विक्री करणे / भेट देणे
(क) भाग संक्रमण (३) व्यावसायिक निधीचे व्यवस्थापन
(ड) डिपॉझिटरी कायदा (४) कंपनीचे मालक
(इ) कर्जरोखेधारक (५) १९९२
(६) व्यावसायिक कार्याचे व्यवस्थापन
(७) चालू खाते
(८) १९९६
(९) कायदेशीर तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण
(१०) कंपनीचे धनको
(क) खालील प्रत्येक विधानासाठी फक्त ‘एक’ शब्द / शब्दसमूह / संज्ञा लिहा (५)
(१) अशा प्रकारचे भाग ज्यांना लाभांश मिळण्यासाठी व भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागांपेक्षा अग्रक्रम दिला जातो.
(२) कंपनीचा दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मध्ये घोषित केला जाणारा लाभांश.
(३) अर्जदारास भाग वाटप केले नसल्याचे कळवणारे पत्र.
(४) भाग बाजारातील कार्यावर नियंत्रण ठेवणारी व नियमन करणारी संस्था.
(५) भागांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित जतन करणारी संस्था.
प्र. २. खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
(२) भागधारक आणि कर्जरोखेधारक
(३) अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
(४) भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र
(५) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
प्र. ३. खालील विषयांवर टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) भांडवल संरचना व तिची भागरूपे (components)
(२) संस्थांसंबंधी (institutional) वित्तपूर्तीची गरज व महत्त्व
(३) बोनस भाग
(४) ठेवींचे नूतनीकरण
(५) मागणी न केलेल्या / वाटप न केलेल्या लाभांशासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही तीन) : [१५]
(१) बंधपत्रधारक हे कंपनीचे मालक नसतात.
(२) भागांचे हस्तांतरण कंपनीच्या पुढाकाराने (initiate) होते.
(३) खाजगी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते.
(४) प्रत्येक अर्जदारास भागांचे वाटप करणे सक्तीचे आहे.
(५) डिमॅटीकरण केलेल्या भागांची हाताळणी अतिशय वेळखाऊ आहे.
प्र. ५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [१०]
(१) कर्जरोख्यांवरील व्याज देण्याबाबतचे पत्र तयार करा.
(२) नाणे बाजारातील कोणत्याही पाच पतसाधनांचे स्पष्टीकरण करा.
(३) कंपनीकडे ठेव ठेवल्याबद्दल ठेवीदाराचे आभार मानणारे पत्र तयार करा.
(४) ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र तयार करा.
प्र. ६. ‘समहक्क भाग’ म्हणजे काय? समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. [१०]
किंवा
भाग वाटपाचे पत्र तयार करा.