चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा : (५) [१५]
(१) व्यवसायामध्ये__________________ भांडवल बहुअंशी कायमस्वरूपी असते.
(अ) स्थिर (ब) कार्यकारी (क) कर्जाऊ
(२) कंपनीला_________________ भाग निर्गमित करावेच लागतात.
(अ) अग्रहक्क (ब) बोनस (क) समहक्क
(३) जर ₹ १०० चा भाग ₹ ११० ला विकला, तर असा भाग_______________विकला असे म्हणता येईल.
(अ) दर्शनी मूल्यास (ब) नफा घेऊन (क) वाढावा घेऊन
(४) भाग भांडवलावर लाभांश निश्चित केला जातो व वाटला जातो, ते भांडवल म्हणजे_______________ भाग भांडवल.
(अ) अधिकृत (ब) विक्रीस काढलेले (क) वसूल
(५) भांडवल बाजारावर नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था म्हणजे__________________
(अ) एन एस ई (NSE) (ब) बी एस ई (BSE) (क) सेबी (SEBI)
(ब) गट ‘अ’ व गट ‘ब’ यांतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा : (५)
गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) प्रतिधारण नफा (१) भाग अधिपत्रधारक
(ब) लहान ठेवीदार (२) कर्जाऊ भांडवल
(क) लाभांश कूपन (३) ₹२५,००० पेक्षा कमी ठेव
(ड) भागावरील परतावा (४) व्याज
(इ) मंदीवाला (bear) (५) रोख्यांच्या चढल्या भावांबद्दल आशावादी
(६) नफ्याची पुनर्गुतवणूक
(७) रोख्यांच्या उतरत्या भावांबद्दल आशावादी
(८) ₹२०,००० पेक्षा कमी ठेव
(९) भागदाखलाधारक
(१०) लाभांश
(क) खालील प्रत्येक विधानासाठी फक्त ‘एक’ शब्द / शब्दसमूह / संज्ञा लिहा : [५]
(१) कमाल नफा मिळवणे हे दर्शविणारे प्रत्येक व्यवसाय कार्याचे मूलभूत तत्त्व.
(२) अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांत विक्री होणारी ठेव पावती.
(३) असा अधिकारी जो कर्जरोख्यांची विक्री करू शकतो.
(४) गुंतवणूकदार व डिपॉझिटरी यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम कारणारी संस्था.
(५) व्याज देण्यासाठी वापरला जाणारा दस्तऐवज.
प्र. २. खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग
(२) भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र
(३) अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश
(४) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
(५) अडत्या (jobber) आणि भाग दलाल (broker)
प्र. ३. खालील विषयांवर टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) वित्तीय नियोजनाचे महत्त्व
(२) बंधपत्राचे प्रकार
(३) भाग हस्तांतरणाची कार्यपद्धती
(४) भाग वाटपाच्या वैधानिक अटी
(५) डिपॉझिटरी पद्धतीची गरज व महत्त्व
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही तीन) : [१५]
(१) प्रत्येक व्यवसाय संघटनेसाठी वित्तीय व्यवस्थापन आवश्यक आहे.
(२) बंधपत्रधारक हे कंपनीचे मालक असतात.
(३) खाजगी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही.
(४) डिमॅटीकरण केलेल्या भागांची हाताळणी अतिशय वेळखाऊ आहे.
(५) भागांचे हस्तांतरण हे कंपनीच्या पुढाकाराने होते.
प्र. ५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : [१०]
(१) लाभांश वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट करा.
(२) कर्जरोख्यांच्या परतफेडीची (redemption) माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र तयार करा.
(३) कंपनीकडे ठेव ठेवल्याबद्दल ठेवीदारास आभार मानणारे पत्र लिहा.
(४) ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे विशद करा.
प्र. ६. लाभांश सूचनापत्र तयार करा. [१०]
किंवा
कर्जरोख्याची व्याख्या द्या व कर्जरोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा.