चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना:
(१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा : (५) [१५]
(१) संचालक मंडळास वित्तीय धोरणाविषयी________________________ सल्ला देतो.
(अ) हिशेब तपासनीस (ब) सचिव (क) वित्त व्यवस्थापक
(२) जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते तिला कंपनीचा________________ म्हणतात.
(अ) भागधारक (ब) बंधपत्रधारक (क) धनको
(३) कंपनीला भागवाटपाचे विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे भागवाटपापासून_________________दिवसांच्या आत सादर करावे लागते.
(अ) ६० (ब) ४५ (क) ३०
(४) सरकारी कंपनी वसूल भागभांडवल व राखीव निधीच्या________________ ठेवी जनतेकडून स्वीकारू शकते.
(अ) ३५% (ब) ३०% (क) २५%
(५) भागवाटपाचा नकार________________ पत्राद्वारे कळविला जातो.
(अ) दिलगिरी (ब) वाटप (क) हप्ता मागणी
(ब) योग्य जोड्या जुळवा : [५ ]
गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) वित्तीय आराखडा (१) बचत खाते
(ब) अधिविकर्ष सवलत (Overdraft facility) (२) अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज
(क) भागांना कमी मागणी असण्याची स्थिती (Under subscription) (३) भाग अधिपत्रधारक
(ड) लाभांश कूपन (४) निधीचे व्यवस्थापन
(इ) ठेवपावती (५) भाग दाखलाधारक
(६) चालू खाते
(७) ठेवीचा पुरावा
(८) कंपनीचा मालक
(९) अपेक्षेपेक्षा कमी अर्ज
(१०) वित्तीय व्यवस्थापनाची आगाऊ योजना
(क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द / शब्दसमूह / संज्ञा सुचवा : [५ ]
(१) भाग बाजारातील मागणी व पुरवठा या अनुसार निश्चित केलेले भागाचे मूल्य.
(२) ठेवींचा स्वीकार करण्याचा अधिकार असलेले कंपनीचे अधिकारी.
(३) भागधारकांमध्ये वाटला जाणारा नफ्यातील हिस्सा.
(४) वचनचिट्ठी स्वरूपात विक्रीस काढले जाणारे सरकारी विपत्र.
(५) प्रतिभूतींची खरेदी-विक्री केले जाणारे ठिकाण,
प्र. २. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) भाग आणि कर्जरोखे
(२) भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण
(३) अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश
(४) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
(५) भागवाटप पत्र आणि दिलगिरी पत्र
प्र. ३. टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) भांडवल संरचना व भागरूपे
(२) भाग अधिपत्र
(३) भागबाजाराची कार्ये
(४) भार्गाची वैशिष्ट्ये
(५) कर्जरोखे परतफेडीची कार्यपद्धती
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण लिहा (कोणतीही तीन) : [१५]
(१) वित्त नियोजनाशिवाय व्यवसायात प्रगती करणे शक्य नाही.
(२) मागताक्षणी परत करावयाच्या ठेवी कंपनी स्वीकारू शकते.
(३) भाग प्रमाणपत्र हा वाहक दस्तऐवज आहे.
(४) डिमॅटीकरण केलेल्या भागांची हाताळणी अतिशय वेळखाऊ आहे.
(५) परिवर्तनीय कर्जरोख्यांचे रूपांतर सामान्य भागांमध्ये करता येते.
प्र. ५. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) ठेवीदारास त्याच्या ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबत पत्र लिहा.
(२) कर्जरोखेधारकाला कर्जरोख्यावरील व्याज दिल्याबाबतच्या पत्राचे प्रारूप तयार करा.
(३) सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणिसाने कोणकोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत ?
(४) लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी कोणत्या?
प्र. ६. अग्रहक्क भागांची व्याख्या लिहा. अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. [१०]
किंवा
भागधारकांना भागवाटपासंबंधीच्या पत्राचे प्रारूप तयार करा