चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
Secretarial Practice (52)
चिटणिसाची कार्यपद्धती (५२)
Time 3 Hours Marks 80
सूचना :
(१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा : (५) [१५]
(१) मोठ्या किरकोळ विक्रीकेंद्रांना जास्त प्रमाणात______________ भांडवलाची गरज असते.
(अ) स्थिर (ब) कार्यकारी (खेळते) (क) कर्जाऊ
(२) अग्रहक्क (preference) भागांना_________________ दराने लाभांश दिला जातो.
(अ) स्थिर (ब) अस्थिर (क) कमी
(३) जर ₹ १०० मूल्य असलेला भाग ₹ ११० ना विकला, तर असा भाग _____________विकला असे म्हणतात.
(अ) दर्शनी मूल्यास (ब) नफ्याने (क) वाढावा घेऊन
(४) कर्जरोख्यांची विक्री १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होत असेल, तर कंपनीला ___________ची मंजुरी घ्यावी लागते.
(अ) सेबी (ब) नोंदणी अधिकारी (क) राष्ट्रीय भागबाजार
(५) कंपनीला ठेव स्वीकारल्यावर ठेव पावती_____________आठवड्यांच्या आत ठेवीदाराला देणे अनिवार्य आहे.
(अ) दोन (ब) चार (क) आठ
(ब) योग्य जोड्या जुळवा : (५)
गट ‘अ ‘गट ‘ब’
(अ) वित्त व्यवस्थापन (१) नफ्याचे वाटप
(ब) प्रतिधारण (retained) नफा (२) ₹२०,००० पेक्षा कमी ठेव
(क) कर्जरोखे विश्वस्त (३) नफ्याचे भांडवलीकरण
(ड) छोटे ठेवीदार (४) १९९६
(इ) डिपॉझिटरी कायदा (५) व्यावसायिक निधीचे व्यवस्थापन
(६) कर्जाऊ भांडवल
(७) कर्जरोखेधारकांचे हितरक्षण
(८) व्यावसायिक कार्याचे व्यवस्थापन
(९) ₹२५,००० पेक्षा कमी ठेव
(१०) १९५६
(क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द / शब्दसमूह / संज्ञा लिहा : (५)
(१) भागधारकांचा असा प्रकार जे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकतात.
(२) लोकांना कंपनीचे भाग खरेदी करण्यासंबंधी केलेले आवाहन करणारा दस्तऐवज.
(३) ठेवी स्वीकारण्याचा कमाल कालावधी.
(४) प्रतिभूती भाग इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात जतन करणारी संस्था.
(५) वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केला जाणारा लाभांश.
प्र. २. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन): [१५]
(१) स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
(२) समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग
(३) भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र
(४) अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश
(५) नाणे बाजार आणि भांडवल बाजार
प्र. ३. टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [१५]
(१) व्यापारी कर्जे
(२) कर्मचारी भाग विकल्प योजना
(३) भाग वाटपाच्या वैधानिक अटी
(४) कर्जरोखे परिवर्तनाची कार्यपद्धती
(५) कर्जरोखे परतफेडीच्या विविध पद्धती
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण लिहा (कोणतेही तीन) : [१५]
(१) सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटनांसाठी वित्तीय व्यवस्थापन आवश्यक आहे.
(२) बंधपत्रधारक कंपनीचे मालक असतात.
(३) भागांचे हस्तांतरण कंपनीच्या पुढाकाराने होते.
(४) कर्जरोखेधारक कंपनीचे धनको असतात.
(५) ठेवीच्या नूतनीकरणास ठेवीदारांची मंजुरी आवश्यक असते.
प्र. ५. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) [१०]
(१) कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र तयार करा.
(२) कंपनीकडे ठेव ठेवल्याबद्दल ठेवीदाराचे आभार मानणारे पत्र तयार करा.
(३) सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ?
(४) भाग विक्री कार्यपद्धतीतील पूर्वतयारीविषयी कामे विशद करा.
प्र. ६. भागधारकांना बोनस भाग वाटपासंबंधीचे पत्र लिहा. [१०]
किंवा
कर्जरोख्यांची व्याख्या लिहा आणि कर्जरोख्यांचे प्रकार स्पष्ट करा.