Secretarial Practice (52) Feb / March 2014 Question Paper
चिटणिसाची कार्यपद्धती (५२) प्रश्नपत्रिका
सूचना :-
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्ये पुन्हा लिहा. (५) [१५]
(१) ‘समहक्कांवर व्यापार‘ (trading on equity) म्हणजे___________ भांडवलाचा कंपनीच्या अर्थपुरवठ्यासाठी उपयोग करणे.
(अ) समहक्क भाग (ब) अग्रहक्क भाग (क) कर्जाऊ
(२)______________ हा भाग भांडवलाचा अविभाज्य (indivisible) हिस्सा आहे.
(अ) कर्जरोखे (ब) भाग (क) बंधपत्रे
(३) कर्जरोखे प्रमाणपत्र (debenture certificate) कर्जरोखे धारकांस वाटपापासून_________ महिन्यांच्या आत प्रदान केले पाहिजे.
(अ) तीन (ब) सहा (क) नऊ
(४) अंतिम लाभांशाची शिफारस करण्याचा अधिकार______________ असतो.
(अ) भागधारकांना (ब) संचालक मंडळाला (क) प्रवर्तकांना
(५) अस्तित्वात असलेल्या (existing) रोख्यांची पुनर्विक्री किंवा व्यापार केल्या जाणाऱ्या बाजारास___________ बाजार म्हणतात.
(अ) वस्तू (ब) दुय्यम (क) प्राथमि
(ब) खालील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा : (५)
‘अ‘ गट ‘ब‘ गट
(अ) स्थिर भांडवल (१) मालकीहक्काचे भांडवल
(ब) अधिविकर्ष (overdraft) सवलत (२) वाहक दस्तऐवज
(क) भाग प्रमाणपत्र (३) स्थिर मालमत्तेमधील गुंतवणूक
(ड) कर्जरोखे (४) चालू (current) खाते
(इ.) भागावरील परतावा (५) भाग अर्ज (application) शुल्क
(६) लाभांश
(७) अस्थिर मालमत्तेमधील गुंतवणूक
(८) कर्जाऊ भांडवल
(९) बचत (savings) खाते
(१०) नोंदणीकृत दस्तऐवज
(क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द / शब्दसमूह / संज्ञा लिहा : (५)
(१) अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांत विक्री होणारी ठेवपावती (depository receipt).
(२) कायदेशीर तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण.
(३) वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केला जाणारा लाभांश.
(४) कर्जरोख्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा.
(५) प्रतिभूतींची खरेदी-विक्री केले जाणारे ठिकाण.
प्र. २. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : [१५]
(१) भाग आणि कर्जरोखे
(२) भाग हस्तांतरण (transfer) आणि भाग संक्रमण (transmission)
(३) अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
(४) नाणेबाजार आणि भांडवल बाजार
(५) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
प्र. ३. टिपा लिहा (कोणतेही तीन) : [१५]
(१) वित्तीय नियोजनाचे महत्त्व.
(२) प्रतिधारण (retained) नफा.
(३) भाग प्रमाणपत्र.
(४) कर्मचारी भाग विकल्प (stock option) योजना.
(५) कर्जरोखे परतफेडीच्या (redemption) विविध पद्धती.
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर‘ किंवा ‘चूक‘ ते सकारण लिहा (कोणतेही तीन) : [१५]
(१) सर्व प्रकारच्या संघटनांसाठी वित्तीय व्यवस्थापन आवश्यक आहे.
(२) समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात.
(३) भागांचे हस्तांतरण हे कंपनीच्या पुढाकाराने होते.
(४) खाजगी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते.
(५) डिमॅटीकरण केलेल्या भागांची हाताळणी अतिशय वेळखाऊ आहे.
प्र. ५. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : [१०]
(१) लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी लिहा.
(२) कर्जरोखे वापटपत्र तयार करा
(३)कर्जरोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र तयार करा.
(४) ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा.
प्र. ६. खालील प्रश्न सोडवा (कोणताही एक ) : [१०]
(१) कर्जरोखा म्हणजे काय? कर्जरोख्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(२) बोनस भागाचे वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.